पिंपरीतील डीलक्स चौकात आयटी अभियंत्याचा धारदार शस्त्रांनी वार करून खून

0
931

पिंपरी, दि. १६ (पीसीबी) – कानाखाली मारल्याचा जाब विचारल्याच्या कारणावरून एका आयटी अभियंत्याचा धारदार शस्त्रांनी वार करून खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना शुक्रवारी (दि.१५) मध्यरात्री पिंपरीतील डीलक्स चौकात घडली. याप्रकरणी तिघांना पिंपरी पोलिसांनी अटक केली आहे.

मंजित प्रसाद असे खून केलेल्या आयटी अभियंत्याचे नांव आहे. मंजित पुण्यातील डब्लूएनएस कंपनीत  अभियंता म्हणून काम  करत होता.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मंजित प्रसाद हे विमाननगर येथील आयटीपार्क मध्ये संगणक अभियंता म्हणून काम करतात.  ते कॅब (बस) ने काळवाडीच्या दिशेने जात होते. बस मध्ये अनेक ऍम्प्लॉईज होते. पिंपरीच्या डीलक्स चौकात काही अज्ञात गुंडांनी रस्ता अडवला त्यांनी बस थांबविण्यास बस चालकाला सांगितले.

बस चालका शेजारी मंजित बसले होते. त्यांनी काय झाले असे गुंडांना विचारले असता त्यातील एका आरोपीने त्यांच्या कानाखाली मारली. याचाच जाब विचारण्यासाठी मंजित बसच्या खाली उतरले. तेव्हा मंजित यांना पाच जणांनी लथाबुक्यांनी मारायला सुरुवात केली. त्यातील काहींनी धारदार शस्त्रांनी पोटावर आणि छातीवर वार केले यात मंजित गंभीर जखमी झाले. त्यांना खासगी रुग्णालयात  उपचारासाठी दाखल केले. त्यांचा उपचारादरम्यान काही तासांनी मृत्यू झाला.