Notifications

पिंपरीतील कामगारनगर येथे दुकानात घुसून अज्ञात हल्लेखोरांनी एकाच कुटुंबातील चौघांवर केले कोयत्याने वार

By PCB Author

February 13, 2019

पिंपरी, दि. १३ (पीसीबी) – दुकानात जबरदस्ती घुसून तीन अज्ञात हल्लेखोरांनी दुकानाचे शटर बंद केले. त्यानंतर एकाच कुटुंबातील चौघांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करत कोयत्याने वार केले. ही धक्कादायक घटना सोमवारी (दि. ११) रात्री पावणेनऊच्या सुमारास पिंपरीतील कामगारनगर येथील अमित ट्रेडर्स या दुकानात घडली.