Pimpri

पिंपरीतील एच ए मैदानवर खून झालेल्या तरुणाची ओळख पटली

By PCB Author

April 21, 2019

पिंपरी, दि २१ (पीसीबी) – डोक्यात दगड आणि सिमेंटचा गट्टू मारुन त्यानंतर पेटवून देऊन एका तरुणाचा खून केल्याचे पिंपरीतील एच ए मैदानावर आज (रविवार) सकाळी आठच्या सुमारास आढळून आले होते.

या घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलिस निरिक्षक कल्याण पवार, गुन्हेशाखेचे पोलिस निरिक्षक रंगनाथ उंडे, गुन्हेशाखेचे पोलिस उपनिरिक्षक अंसार शेख, पोलिस उपनिरिक्षक हरिदास बोचरे यांनी घटनास्थळी धाव घेऊन तपासाला सुरुवात केली.

घटनास्थळी पोलिसांना एक मोबाईल फोन सापडल्याने मयत तरुणाची ओळख पटवण्यात यश आले आहे. अजय राजेश नागोसे (वय १९, रा. गांधीनगर) असे त्याचे नाव आहे. अजय हा एच.ए.कंपनीतील कॅन्टीनमध्ये कामाला होता. शनिवारी त्याने कामाला जातो म्हणून घर सोडले होते. मात्र त्याचा रात्री उशीरा अज्ञातांनी दगडाने ठेचून आणि पेटवून खून केला. अजय याचा खून कोणी आणि का केला हे अद्याप समजु शकले नाही. पिंपरी पोलीस तपास करत आहेत.