पिंपरीगावात ट्रॅक्टरच्या धडकेत वृध्दाचा मृत्यू

0
429

पिंपरी, दि. २० (पीसीबी) – भरधाव ट्रॅक्टरने दिलेल्या जोरदार धडकेत एका वृध्द दुचाकीस्वाराचा गंभीर जखमी होऊन मृत्यू झाला. ही घटना सोमवार (दि.१९) सकाळी पावणेदहाच्या सुमारास पिंपरीतील माऊली न्युज पेपर एजन्सी समोरील रस्त्यावर घडली.

विलास बबन नाणेकर (वय ५५, रा. नवमहाराष्ट्र शाळेजवळ, नानेकरवाडा, पिंपरीगाव) असे मृत वृध्दाचे नाव आहे. याप्रकरणी समीर दिलीप नाणेकर (वय २८, रा. नवमहाराष्ट्र शाळेजवळ, नानेकरवाडा, पिंपरीगाव) यांनी पिंपरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, ट्रॅक्टर (क्र. केए/३३/टीए/७७२६) वरील चालक परशुराम पांडुरंग राठोड (वय ३७, रा. बौध्दनगर, पिंपरी) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी सकाळी पावणेदहाच्या सुमारास विलास नाणेकर हे त्यांच्या दुचाकी (क्र.एमएच/१४/जीआर/०२७५) वरुन पिंपरीगावातील शिवाजीपुतळ्याजवळ जात होते. यावेळी आरोपी परशुराम राठोड याने त्याच्या ताब्यातील ट्रॅक्टर (क्र. केए/३३/टीए/७७२६) भरधाव वेगाने चालवून विलास यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या विलास यांचा मृत्यू झाला. ट्रॅक्टर चालक परशुराम सध्या फरार आहे. पिंपरी पोलिस त्याचा शोध घेत आहेत.