पाषाण तलावाजवळ गवा आढळला; वनविभाग, पोलीस प्रशासन घटनास्थळी दाखल

0
374

पुणे, दि. २१ (पीसीबी) : बावधन येथील पाषाण तलावाजवळ असलेल्या जंगलात आज (मंगळवारी, दि. 22) सकाळी गवा आढळला. त्याला सुरक्षित पकडण्यासाठी वनविभागाचे पथक दाखल झाले आहे. पोलीस देखील घटनास्थळी पोहोचले आहेत. पुण्याच्या कोथरूड परिसरात 9 डिसेंबर रोजी गवा आढळला होता. काँक्रीटच्या जंगलात पळून पळून त्याची दमछाक झाली. वनविभागाने मोठ्या शिताफीने त्याला पकडले. मात्र तो जखमी झाला होता. दरम्यान त्याचा मृत्यू झाला.

त्यानंतर 12 दिवसांनी पुन्हा पुण्याजवळ बावधन परिसरात रानगव्याचे दर्शन झाले आहे. पाषाण तलावाजवळ असलेल्या जंगलात हा गवा आज सकाळी आठ वाजता दिसला आहे. त्यानंतर याची माहिती वनविभाग आणि पोलिसांना देण्यात आली आहे. वनविभागाचे एक पथक गव्याला सुरक्षित पकडण्यासाठी बावधन येथे दाखल झाले आहे. तर नागरिकांची गर्दी होऊ नये. तसेच अन्य खबरदारीसाठी पोलीस देखील घटनास्थळी दाखल झाले आहेत. नागरिकांनी महामार्गावर आणि बावधन परिसरात गर्दी करू नये, असे प्रशासनाकडून आवाहन करण्यात आले आहे.