Chinchwad

पाषाणमध्ये व्हॉट्सअॅप व्हिडिओ कॉलवर अश्लील चाळे करुन महिलेचा विनयभंग

By PCB Author

July 22, 2019

हिंजवडी, दि. २२ (पीसीबी) – महिलेच्या व्हॉट्सअॅप क्रमांकावर व्हिडिओ कॉल करुन एका इसमाने अश्लील चाळे करत विनयभंग केल्याची घटना समोर आली आहे. ही घटना हिंजवडी पोलिस ठाणे हद्दीतील पाषाण येथे घडली.

याप्रकरणी पिडित ३१ वर्षीय महिलेने हिंजवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अंकुश नारायण दळवी यांच्या नावे असलेला मोबाईल (क्र.९३७०९७२००४) वापरणाऱ्या इसमाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवार (दि.३ जुलै) सकाळी साडेआठच्या सुमारास पीडित महिला या राहत्या घरी घरकाम करत होत्या. यावेळी अंकुश नारायण दळवी यांच्या नावे असलेला मोबाईल (क्र.९३७०९७२००४) वापरणाऱ्या इसमाने महिलेच्या व्हॉट्सअॅप क्रमांकावर वारंवार व्हिडिओ कॉल करुन अश्लील चाळे करत विनयभंग केला. आरोपीला अद्याप अटक करण्यात आलेले नाही. पोलिस उपनिरीक्षक गोविंद पवार तपास करत आहेत.