पावसाळ्यात एन्जॉय करा खास मक्याचे कबाब; एकदा खाल तर खातच रहाल!

0
571

मुंबई, दि. १० (पीसीबी) – पावसाळ्यामध्ये गरमा-गरम चहासोबतच आवर्जुन खावासा पदार्थ म्हणजे भुट्टा…. म्हणजेच, मक्याचे कणीस. अनेकदा पावसाळ्यामध्ये गरमा-गरम टेस्टी, मसालेदार पदार्थ खाण्याची इच्छा होत असते. पण या वातावरणामध्ये बॅक्टेरियांची भितीही फार असते. त्यामुळे स्ट्रिट फूडपासून दूर राहण्याचा सल्ला अनेकदा आपल्याला देण्यात येतो. पण अजिबात चिंता करू नका. आज आम्ही तुम्हाला एक हटके रेसिपी सांगणार आहोत. जी तुमची चमचमीत खाण्याची इच्छा पूर्ण करण्यासोबतच आरोग्यासाठीही फायदेशीर ठरेल.

चला तर मग बघूया कशाप्रकारे करता येतील मका कबाब…

बटाटा आणि मका उकडून स्मॅश करा त्यामध्ये जायफळ पावडर, धने, दालचिनी पावडर, बारिक चिरलेल्या मिरच्या, आलं-लसणाची पेस्ट, गरम मसाला पावडर, मीठ, मक्याचे पीठ, आमचूर पावडर सर्व साहित्य एकत्र मिक्स करून त्याचे लहान-लहान आकाराचे गोळे तयार करून घ्या. प्रत्येक गोळ्यामध्ये एक टूथपिक लावा आणि तेलामध्ये डिप फ्राय करा. पुदिन्याच्या चटणीसोबत सर्व्ह करा. अशारितीने मक्याचे हेल्दी आणि टेस्टी कबाब खाण्यासाठी तयार.