Pimpri

पावनेसहा लाखांच्या ६७ मोबाईलसह दोघांना गुन्हे शाखेने केले अटक

By PCB Author

February 11, 2019

पिंपरी, दि. ११ (पीसीबी) – विक्रि करण्यासाठी आलेल्या ५ लाख ८५ हजार रुपये किमतीच्या ६७ मोबाईलसह दोघांना अटक तर एका अल्पवयीन आरोपीला गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने ताब्यात घेतले आहे. ही कारवाई नाशिकफाटा येथे करण्यात आली.

अमिन सज्जाद इनामदार (व २५, रा. आदर्शनगर, मोशी) आणि शेखर संभाजी जाधव (वय १९, रा. दिघीरोड, स्वययंभु गणेश मंदिराजवळ, भोसरी) असे अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे असून एक अल्पवयीन आरोपीला देखील ताब्यात घेण्यात आले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुन्हे शाखा युनिट १ चे सहायक पोलीस निरीक्षक गणेश पाटील हे भोसरी पोलीस ठाणे परिसरात गस्तीवर होते. यावेळी त्यांना त्यांच्या खबऱ्याकडून माहिती कि, नाशिकफाटा परिसरात एकजण चोरीचे मोबाईल विक्री करण्यासाठी येणार आहे. यावर पोलिसांनी त्या ठिकाणी सापळा रचून अमिन याला तर शेखर आणि त्याच्या अल्पवयीन साथीदाराला भोसरी ओव्हर ब्रीज खालून ताब्यात घेतले. या तिघांची कसून चौकशी केली असता अमिन याने १३ मोबाईल हे भोसरी परिसरातून चालत बोलत जाणाऱ्याचे चोरले, शेखर याने ४१ मोबाईल उघड्या दरवाजा आणि खिडकी वाटे चोरल्याचे सांगितले. तर अल्पवयीन आरोपीकडून १३ मोबाईल हस्त करण्यात आले. गुन्हे शाखेने असे एकूण ५ लाख ८५ हजार रुपये किमतीच्या ६७ मोबाईल या तिघांकडून जप्त केले. यातील अमिन आणि शेखर हे सराईत मोबाईल चोर असून त्यांना यापूर्वी देखील अटक करण्यात आली होती.

दरम्यान भोसरी, भोसरी एमआयडीसी आणि परिसरातून ज्या कुणाचे मोबाईल चोरीला गेली असतील त्यांनी गुन्हे शाखा युनिट १, मोहननगर, चिंचवड येथील सहायक पोलीस निरीक्षक गणेश पाटील (मो. क्र. ९७०२९९९४६७) यांच्याशी संपर्क करावा असे आवाहन करण्यात आले आहे.