पालापाचोळ्यापासून चितारलेल्या चित्रांचे चिंचवडमध्ये प्रदर्शन; नगरसेवक शत्रुघ्न काटेंच्या हस्ते उद्घाटन

0
897

चिंचवड, दि. ११ (पीसीबी) – अरूंधती तुळापूरकर यांनी पालापाचोळ्यापासून चितारलेल्या चित्रांचे चिंचवडमध्ये प्रदर्शन भरवण्यात आले आहे. त्याचे भाजप नगरसेवक शत्रुघ्न काटे यांच्या हस्ते मंगळवारी (दि. ११) उद्घाटन झाले.

चिंचवड, चापेकर चौक येथील पी. एन. जी. कलादालनात १६ डिसेंबरपर्यंत सकाळी ११ ते रात्री ८ या वेळेत हे चित्रप्रदर्शन सुरू राहणार आहे. अरूंधती तुळापूरकर यांनी रंग आणि ब्रशशिवाय केवळ वाळलेली पाने आणि फुलांपासून अप्रतिम चित्रे बनवली असून, ती फ्रेममध्ये साकारण्यात आली आहेत. या प्रदर्शनाचे उद्घाटन नगरसेवक शत्रुघ्न काटे यांच्या हस्ते झाले. यावेळी अरूंधी तुळापूरकर उपस्थित होत्या. पानगळीतील निसर्गाचा नवा आविष्कार पाहण्यासाठी नागरिकांनी या चित्रप्रदर्शनाला भेट द्यावी, असे आवाहन तुळापूरकर यांनी केले आहे.