पार्श्वगायिकेच्या 15 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार

0
433

हैदाराबाद, दि.१४ (पीसीबी) : प्रसिद्ध पार्श्वगायिकेच्या 15 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना हैदाराबादमध्ये उघडकीस आली आहे. धक्कादायक म्हणजे या प्रकरणी पीडितेच्या सख्ख्या मावशीसह चौघा जणांना अटक करण्यात आली आहे. पार्श्वगायिकेने जिच्याविरोधात तक्रार केली ती सख्खी बहीणही गायिका आहे, तर बहिणीचा पती संगीतकार आहे. याशिवाय त्यांच्या नातेवाईकाचा मुलगा आणि चर्चच्या पाद्रीविरोधात तक्रार नोंदवण्यात आली आहे.

संबंधित पार्श्वगायिका चेन्नईत सुट्टी घालवण्यासाठी गेली होती. त्यावेळी तिने आपल्या अल्पवयीन मुलीला मावशीच्या घरी ठेवलं. या काळात मावशी, तिचा पती, त्यांच्या नातेवाईकाचा मुलगा यांनी तिचा विनयभंग केल्याचा आरोप आहे. स्थानिक मीडियाच्या माहितीनुसार मावशीने तिला चेन्नईतील किलपौक भागात असलेल्या चर्चमध्ये नेलं. तिथे हेन्री पॉल या पाद्रीने मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची माहिती आहे.

पीडितेने घडला प्रकार आईला सांगितला
या प्रकाराची माहिती पीडित मुलीने फोन करुन आपल्या आईला दिली. धक्का बसलेल्या पार्श्वगायिकेने ताबडतोब चेन्नई गाठलं. त्यानंतर किलपौकमधील महिला पोलिस स्थानकात तिने चौघा आरोपींविरोधात तक्रार दाखल केली. पीडिता अल्पवयीन असल्यामुळे पॉक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.