पार्थ, रोहित, अजित पवार कोणीही निवडणूक लढवणार नाही; शरद पवारांची स्पष्टोक्ती  

0
476

पुणे, दि. २० (पीसीबी) –  पार्थ पवार किंवा रोहित पवार यांच्यापैकी कोणीही येत्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीला उभे राहणार नाही, असे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्पष्ट केले. तसेच माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवारही लोकसभा निवडणुकीत उतरणार नाहीत, असेही त्यांनी म्हटले आहे. 

पुण्यात पत्रकार परिषदेत  शरद पवार बोलत होते. दरम्यान, पवार कुटुंबातील चार सदस्य लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार, अशी चर्चा गेल्या  अनेक दिवसापासून सुरू होती. मात्र, पार्थ पवार, रोहित पवार आणि अजित पवार यांच्यापैकी कोणीही लोकसभा निवडणुकीला उभे राहणार नाही, असे पवारांनी सांगितले. आपण मात्र माढ्यातून लोकसभा निवडणूक लढवणार आहे, असे पवारांनी सांगितले.

अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार मावळ लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याची चर्चा रंगली होती. तर, अजित पवार शिरुर मतदारसंघातून लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचे संकेत मिळत होते. मात्र, या शक्यता शरद पवार यांनी फेटाळून लावली आहे.