Maharashtra

पार्थ फिरायला लागला म्हणजे निवडणूक लढवणारच, असे काही नाही – अजित पवार  

By PCB Author

February 12, 2019

मुंबई, दि. १२ (पीसीबी) – आजकाल मुलं त्यांचा निर्णय स्वत: घेतात. पार्थबाबत पक्षाने अद्याप काहीही स्पष्ट केलेले नाही. पार्थ निवडणुकीच्या प्रचाराला फिरायला लागला म्हणजे निवडणूक लढवणार असे होत नाही, असे राष्ट्रवादीचे नेते व माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले आहे.  

एका वृत्तवाहिनीशी अजित पवार बोलत होते. यावेळी त्यांना पार्थ पवार मावळ मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याची चर्चा  सुरू आहे. याबाबत  छेडले असता ते  म्हणाले की, आजकालची मुले स्वत: निर्णय घेऊ लागली आहेत. पार्थ आगामी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी मावळ मतदारसंघात फिरत आहे. याचा अर्थ तो निवडणूक लढवणारच, असा होत नाही.

दरम्यान, अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांनी मवाळ मतदारसंघात आपला संपर्क वाढविण्यास सुरूवात केली आहे. मवाळमध्ये विविध कार्यक्रमांना त्यांची हजेरी वाढू लागली आहे. पिंपरी –चिंचवडमध्ये ही त्यांचे दौरे वाढले आहेत. शहरातील अनेक चौकातील फ्लेक्सवर त्यांचे छायाचित्र झळू लागले आहे. यामुळे पार्थ मावळमधून लोकसभा लढवणार असल्याचे निश्चित मानले जात आहे.