पार्थ पवारला निवडून आणण्याचा प्रयत्न करणार – रोहित पवार  

0
734

पुणे, दि. १२ (पीसीबी) – राष्ट्रवादीने पार्थ पवारला किंवा कोणत्याही उमेदवाराला तिकीट दिले, तर त्यांना निवडून आणण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला जाईल, असे पुणे जिल्हा परिषदेचे सदस्य रोहित पवार यांनी म्हटले आहे.  तसेच मी लोकसभेसाठी कधीही इच्छुक नव्हतो, असेही त्यांनी स्पष्ट केले.

एका वृत्तवाहिनीशी पवार बोलत होते. दरम्यान, रोहित पवार यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी माढामधून निवडणूक न लढवण्याच्या निर्णयाचा पुनर्विचार करावा, अशी भावनिक पोस्ट केली आहे. याबाबत रोहित पवार म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता म्हणून, पवारांवरील प्रेमापोटी ती पोस्ट केली आहे.

दरम्यान, पवार साहेबांबद्दलचे आपले विधान हे शेवटच असू द्या, तसेही बेडकासारखे हवा भरुन बैल होण्याच्या नादात आपण फुटणार होताच. पण अशी विधाने करत राहिलात तर हवा भरण्याच्या आतच फुटाल, अशी टीका रोहित पवार यांनी विरोधकांवर केली आहे.