पिंपरी, दि. २४ (पीसीबी) – मावळ लोकसभेचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार आणि अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार अडखळत्या भाषणामुळे टीकेचे विषय ठरले होते. आता पार्थने पंतप्रधान मोदी यांचा एकेरी उल्लेख केल्याने सोशल मीडियावर ते ट्रोल होऊ लागले आहेत.
पिंपरी-चिंचवड मध्ये पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या बैठकीत बोलताना ‘तो’ एक मोदी गुजरात भारतभर मांडू शकतो, तर पिंपरी-चिंचवड महाराष्ट्रभर का नाही मांडू शकत, असे पार्थ पवार यांनी म्हटले आहे.
पार्थ याच्या पहिल्या भाषणावर टीका होत असताना त्यांने पंतप्रधान नरेंद्र मोदीं यांचा एकेरी उल्लेख केल्याचे पाहायला मिळाले आहे. त्यामुळे ते पुन्हा एकदा ट्रोल होण्याची शक्यता नाकारता येत नाही. पार्थ पवार पहिल्या भाषणामुळे चांगलेच सोशल मीडियावर ट्रोल झाले होते.