पार्थसाठी पनवेलमध्ये आला आहात का? अजित पवार म्हणाले, आघाडीच्या उमेदवारासाठी

0
668

पनवेल,   दि. १३ (पीसीबी) –  पार्थ पवार यांच्यासाठी आपण पनवेलमध्ये आला आहात का? असा प्रश्न राष्ट्रवादीचे नेते आमदार अजित पवार यांना केला असता त्यांनी नकार दिला. तसेच आपण येथे काँग्रेस-राष्ट्रवादीच्या उमेदवारासाठी आलो  आहोत, असे सांगून पार्थ पवार यांच्या उमेदवारीबद्दल भाष्य करण्याचे त्यांनी कुशलतेने टाळले. 

कुणाला कुठुन उमेदवारी द्यायची याचा निर्णय प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील घेणार आहेत, असे त्यांनी यावेळी   स्पष्ट केले. अजित पवार यांनी आज (बुधवार) पनवेल येथे काँग्रेस आणि शेतकरी कामगार पक्षांच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी आघाडीच्या उमेदवारासाठी कामाला लागा, असे आवाहन केले. मात्र, यावेळी त्यांनी पार्थ पवार यांच्या उमेदवारीवर बोलणे टाळले.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी माढ्यातून माघार घेतली आहे. त्यामुळे पार्थ पवार यांची मावळ लोकसभा मतदारसंघातून  उमेदवारी निश्चित मानली जात आहे. त्यासाठीच अजित पवार यांचे मतदारसंघामध्ये  दौरे वाढले आहेत.  मात्र, आज पनवेल दौऱ्यावर असताना त्यांनी पार्थ यांच्या उमेदवारीबाबत बोलण्याचे टाळले.