पादचारी तरुणाचा मोबाईल हिसकावणा-या तिघांना अटक

0
263

दिघी, दि. २५ (पीसीबी) – रस्त्याने पायी चालत जात असलेल्या तरुणाचा तिघांनी मोबाईल हिसकावला. पोलिसांनी तिन्ही चोरट्यांना बेड्या ठोकल्या आहेत. ही घटना शनिवारी (दि. 24) दुपारी सव्वाचार वाजताच्या सुमारास गणेशनगर बोपखेल येथे घडली.

श्रीकांत अंबादास वाघमोडे (वय 19), श्रेयस मोरेश्वर शेळके (वय 19), ओमकार गंगाधर गायकवाड (वय 20, तिघे रा. चिखली) अशी अटक केलेल्या चोरट्यांची नावे आहेत याबाबत संदीप सुरज विश्वकर्मा (वय 20, रा. दिघी) यांनी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी दुपारी सव्वाचार वाजताच्या सुमारास फिर्यादी संदीप विश्वकर्मा हे गणेशनगर बोपखेल येथील बिकानेर स्वीट या दुकानाजवळून रस्त्याने पायी चालत जात होते. त्यावेळी एका दुचाकीवरून तीन चोरटे आले. फिर्यादी फोनवर बोलत असताना चोरट्यांनी त्यांच्या हातातील दहा हजार रुपये किमतीचा मोबाईल फोन जोरात हिसका देऊन चोरून नेला. पोलिसांनी तिन्ही चोरट्यांना अटक केली आहे. दिघी पोलीस तपास करीत आहेत.