Banner News

पाण्यासाठी नगरसेविका सुजाता पालांडेंचे पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन

By PCB Author

August 12, 2019

पिंपरी, दि. १२ (पीसीबी) – पिंपरीतील संत तुकारामनगरमधील नागरिकांना पुरेशा पाणीपुरवठा होत नाही. या प्रश्नांकडे महापालिका प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी भाजपच्या नगरसेविका सुजाता पलांडे यांनी नेहरूनगर येथील पाण्याच्या टाकीवर चढून आज (सोमवार) अनोखे आंदोलन केले.

याप्रसंगी स्वीकृत नगरसेवक माऊली थोरात, यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. तर या प्रकाराची माहिती कळताच परिसरातील नागरिकांनी गर्दी केली.

सुजाता पालांडे म्हणाल्या की, शहराला पाणीपुरवठा सुरळीत करण्यात आला आहे. मात्र, संत तुकारामनगर, महेशनगर आणि फुलेनगर येथे मुबलक आणि अधिक दाबाने पाणीपुरवठा होत नाही. त्यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे. तांत्रिक कारण असेल, तर ते दूर करण्यापेक्षा पाणी पुरवठ्याबाबत अधिकारी महापौरांना चुकीचे मार्गदर्शन करत आहेत.

आपण सत्ताधारी भाजपच्या नगरसेविका असलो तरी, पाण्याच्या प्रश्नांवर प्रशासनाचे लक्ष वेधणे हे आपले काम आहे. पाण्यासाठी नागरिक हवालदिल झाले आहेत. यामुळेच हे आंदोलन करण्याचा आपण मार्ग स्वीकारला, असे नगरसेविका पालांडे यांनी सांगितले.