पाण्यात उघड्या पडलेल्या विजेच्या तारेवर पाय डल्याने एकाचा दुर्देवी मृत्यू

0
395

मुंबई, दि. ७ (पीसीबी) – पाण्यात उघड्या विजेच्या तारेवर पाय डल्याने एका पादचाऱ्याचा मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना शनिवारी (दि.६) रात्री उशीरा दीडच्या सुमारास शीव-पनवेल महामार्गावर घडली.

सुरेश जुनघरे (वय ३५, रा. तुर्भे) असा विजेचा धक्का लागून मृत्यू झालेल्या इसमाचे नाव आहे.

शनिवारी रात्री दीडच्या सुमारास सुरेश हे त्यांचे काम आटपून घरी निघाले होते. सानपाडा रेल्वे स्टेशन बाहेरील शीव-पनवेल महामार्गावरील बस थांब्यापाशी पोहचले असता पाण्यात उघड्यावर पडलेल्या विद्युत वायरचा त्यांना शॉक लागला. जवळील रस्त्याच्या दुरूस्तीचे काम करतेवेळी उघडी झालेली विद्युत केबल डबक्यात पडून विद्युत प्रवाह पाण्यात उतरला होता. नेमका त्यातच सुरेश यांचा पाय पडला व त्यांचा करूण अंत झाला. सुरेश यांच्या मागे पत्नी आणि दोन अपत्य आहे.  सानपाडा पोलिस तपास करत आहेत.