‘पाणी वाचवा’ संदेशासह सलमानने पूर्ण केले ‘बॉटल कॅप चॅलेंज’

0
657

मुंबई, दि. १५ (पीसीबी) – गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर ‘बॉटल कॅप चॅलेंज’ची क्रेझ पाहायला मिळते. अगदी सामान्यांपासून ते सेलिब्रिटीजपर्यंत अनेकजण बाटलीवरील झाकण बाटली हलू किंवा पडू न देता काढताना हे चॅलेंज स्वीकारताना दिसत आहेत. ‘बॉटल कॅप चॅलेंज’चे व्हिडीओ अनेक कलाकार सोशल मीडियावर पोस्ट करत आहेत. नुकताच बॉलिवूडचा सर्वांचा लाडका दबंग खाननेदेखील हे चॅलेंज पूर्ण केले आहे. त्याने हे चॅलेंज पूर्ण करत एक महत्वाचा संदेश देखील दिला आहे.

सलमानने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर ‘बॉटल कॅप चॅलेंज’ पूर्ण करताना व्हिडीओ शेअर केला आहे. पण सलमानने बाटलीवरील झाकण पायाने न काढता एकद मजेशीर अंदाजात काढले आहे. त्याने फूंकर मारून बाटलीवरील झाकण पाडले असून पाणी वाचवण्याचा संदेश दिला आहे. सध्या सलमानचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

यापूर्वी बॉलिवूडमधील अभिनेता अक्षय कुमार, सिद्धार्थ चतुर्वेदी, टायगर श्रॉफ, कुणाल खेमू, अभिनेत्री सुष्मिता सेनसारख्या इतर कलाकारांनी ‘बॉटल कॅप चॅलेंज’ स्वीकारून व्हिडीओ पोस्ट केले आहेत. हे चॅलेंज स्वीकारण्यात बॉलिवूड कलाकारांसह मराठी कलाकारही मागे नाहीत. सिद्धार्थ चांदेकर, स्वप्निल जोशी आणि अमृता खानविलकर यांनीदेखील अनोख्या ढंगात हे चॅलेंज पूर्ण करण्याचा प्रयत्न केला.