पाटण्यात काँग्रेसच्या बॅनरवर नेत्यांच्या जातीचा उल्लेख

0
688

पाटणा, दि. २७ (पीसीबी) – बिहारमध्ये काँग्रेसने लावलेल्या बॅनरवर काँग्रेस नेत्यांचे फोटो छापून त्यावर त्यांच्या जातींचा उल्लेख करण्यात आला आहे. ‘सामाजिक समरसता’ या  मथळ्याखाली हे बॅनर छापण्यात आले आहेत. पाटण्यातील इन्कम टॅक्स चौकात हे बॅनर लावले आहेत. या प्रकारावर सर्व स्तरातून टीकेची झोड उठवण्यात येत आहे.

बिहार राज्यातील कार्यकारिणीत काँग्रेसने मोठे बदल केले आहेत. अनेक नव्या नेत्यांना महत्त्वाच्या पदांवर वर्णी लावण्यात आलेली आहे. यात विविध समाजातील व्यक्तींचा समावेश करण्यात आला आहे. त्यानंतर  “नव नियुक्त बिहार काँग्रेस कार्य समिती में सामाजिक समरसता की मिसाल कायम” असा मथळा छापत हे बॅनर लावण्यात आले आहेत.

आपण किती ‘सर्वधर्म-जात समभाव’ मानतो, हे दाखवण्यासाठी स्थानिक काँग्रेस नेत्यांनी चक्क या नव्या कार्यकारिणीतील नेत्यांच्या जाती शोधून, त्यांचे ओंगळवाणी प्रदर्शन  घडवून आणले आहे. त्यावर त्यांचे फोटो छापून  त्यांच्या जातींचाही उल्लेख करण्यात आलेला आहे.