‘पाच वर्षे सत्तेत राहून माझा पराभव झाला. मात्र याचा आनंद सर्वात जास्त माझ्या मुलाला झाला आहे,’

0
480
बीड, दि.२१ (पीसीबी) –‘पराभव झाल्यामुळे मी जास्त वेळ घरीच असते आणि म्हणून घरातल्या व्यक्तींना मी वेळ देऊ शकते. आता घरातल्या व्यक्तींसाठी माझ्याकडे वेळच वेळ आहे. त्यामुळे माझ्या घरातील लोक आनंदी आहेत,’ अशी प्रतिक्रिया भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी दिली. त्या बीडमध्ये एका कार्यक्रमात बोलत होत्या.
यावेळी बोलताना त्या म्हणाल्या, ‘पाच वर्षे सत्तेत राहून माझा पराभव झाला. मात्र याचा आनंद सर्वात जास्त माझ्या मुलाला झाला आहे,’ असे त्या म्हणाल्या. तसेच ‘पाच वर्ष सत्तेनंतर आम्ही निवडणुकीला समोर गेलो. यात माझा पराभव झाला. राजकीय कामांमुळे मला घरी वेळ देता येत नव्हता. मात्र आता वेळ देत असल्यामुळे मुलाला आनंद झाला,’ असे त्यांनी यावेळी बोलताना सांगितले.