पाच वर्षात कोणताही राजकीय भूंकप आला नाही; मोदींचा राहुल गांधींना चिमटा

0
787

नवी दिल्ली, दि. १३ (पीसीबी) – लोकसभेत पहिल्यांदाच आपण अनेक गोष्टी अनुभवल्या.  गळाभेट आणि गळ्यात पडणे यातला फरक पहिल्यांदाच कळला, असा टोला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचे नाव न घेता लगावला.  पाच वर्षात कोणताही राजकीय भूंकप आला नाही,  असेही चिमटा त्यांनी काढला.

पंतप्रधान मोदी यांनी १६ व्या लोकसभेतील अखेरचे भाषण केले. यावेळी त्यांनी  राहुल गांधींसह विरोधकांना कोपरखळ्या मारल्या.

आम्ही ऐकत होतो की भूकंप येणार म्हणून…पण कोणताही भूकंप आला नाही. कधी विमाने उडवण्यात आली. पण आपल्या लोकशाहीची उंची इतकी मोठी आहे की कोणतेही विमान त्या उंचीपर्यंत जाऊ शकले नाही, असे मोदी म्हणाले.

मोदी पुढे म्हणाले की, मी पहिल्यांदा येथे आलो तेव्हा अनेक गोष्टी नव्याने कळल्या. पहिल्यांदाच पाहिले की सभागृहात अनेकांची आँखो की गुस्ताखिया सुरु आहेत. यावेळी मोदी यांनी लालकृष्ण अडवाणी आणि मल्लिकार्जून खर्गे यांचे कौतुकही केले. लोकप्रतिनिधी म्हणून आपली जबाबदारी अत्यंत योग्य पद्धतीने त्यांनी सांभाळली, असे ते म्हणाले.