पाच लाखांचे कर्ज मंजूर केल्याचे भासवून पिंपळे गुरव येथील महिलेची ९८ हजारांची फसवणूक

0
514

चिंचवड, दि. १३ (पीसीबी) – पाच लाखांचे कर्ज मंजूर केल्याचे भासवून पिंपळे गुरव येथील एका महिलेची ९८ हजार रुपयांची अर्थीक फसवणूक करण्यात आली. ही फसवणूक ऑनलाईन माध्यमाव्दारे २३ एप्रिल ते १२ जून २०१८ दरम्यान करण्यात आली.

शुभांगी पाटील (वय २४, रा. आदर्शनगर, पिंपळे-गुरव) असे फसवणूक झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी त्यांनी अज्ञात तीन मोबाईलधारक आणि एका महिला बँक खातेधारकांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २३ एप्रिल ते १२ जून २०१८ दरम्यान आरोपी मोबाईलधारक तीन इसमांनी फिर्यादी शुभांगी पाटील यांना कर्जाची गरज असल्याची विचारना करुन त्यांना मनी सोल्युशन कंपनी, जनकपुरी, नवी दिल्ली या कंपनीने पाच लाखांचे कर्ज मंजूर केले असल्याचे सांगीतले. त्यानंतर ते कर्ज देण्यासाठी वेळोवेळी एकूण ९८ हजारा रुपये एका अज्ञात महिलेच्या बँक खात्यात आर.टी.जी.एस.आय.एम.पी.सी च्या माध्यमाव्दारे भरण्यास सांगितले. मात्र बरेच दिवस उलटून देखील शुभांगी यांना पाच लाखांची रक्कम प्राप्त झाली नाही. यावर त्यांची फसवणूक झाल्याचे लक्षात आले.  त्यांनी तातडीने सांगवी पोलीसात धाव घेऊन अज्ञात तीन मोबाईलधारक आणि एका महिला बँक खातेधारका विरोधात तक्रार दाखल केला. सांगवी पोलीस अधिक तपास करत आहेत.