Desh

पाच कोटींचे कर्ज बुडवल्याप्रकरणी अभिनेता राजपाल यादवसह पत्नी दोषी

By PCB Author

April 14, 2018

पाच कोटींचे कर्ज बुडवल्याप्रकरणी विनोदी अभिनेता राजपाल यादव आणि त्याची पत्नी राधा यादवला दिल्लीतील एका न्यायालयाने दोषी ठरवले आहे. २०१० मध्ये   एका चित्रपटासाठी राजपाल यादवने ५ कोटींचे कर्ज घेतले होते. मात्र,त्या कर्जाची यादव यांने परतफेड केली नव्हती.

राजपाल यादवने दिग्दर्शीत केलेला ‘अता पता लापता’ हा चित्रपट २०१२ मध्ये प्रदर्शित झाला होता. यामध्ये राजपाल यादव स्वत: तसेच दारासिंग, असरानी आणि विक्रम गोखले यांच्या प्रमुख भूमिका होत्या. कर्ज फेडण्यासाठी त्याने दिलेले चेक बाऊन्स झाल्यामुळे त्याची कंपनी आणि पत्नीला सात प्रकरणांत दोषी ठरवले आहे. मुरली प्रोजेक्टेस प्रा. लि.ने राजपाल यादवच्या विरोधात चेक बाऊन्सशी निगडीत सात तक्रारी दाखल केल्या होत्या.

राजपाल यादव यांने  ‘अता पता लापता’ हा चित्रपट पूर्ण करण्यासाठी एप्रिल २०१० मध्ये मदत मागितली होती. त्यानंतर ३० मे २०१० मध्ये दोघांमध्ये एक करार झाल्यानंतर राजपाल यादवला ५ कोटी रूपयांचे कर्ज दिले. करारानुसार राजपाल यादवला तक्रारकर्त्याला ८ कोटी रूपये द्यायचे होते. मात्र, यादव यांने ते चुकते केलेले नाही.