Pune Gramin

पाचाणे मावळ येथील वनजमीनीवर ३००० झाडांची लागवड

By PCB Author

July 16, 2018

मावळ, दि. १५ (पीसीबी) – निगडीतील स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळाच्या वतीने कासारसाईजवळील पाचाणे येथील वनजमीनीवर आज (सोमवारी) सुमारे २१० निसर्ग मित्र व विद्यार्थ्यांनी एकत्रितपणे तिन हजारांपेक्षा जास्त बांबूची झाडांचे वृक्षारोपण केले. 

वडगाव मावळ वन परिक्षेत्र अधिकारी सोमनाथ ताकवले यांनी केलेल्या आवाहनानुसार सावरकर मंडळाच्या निसर्ग मित्र विभागाने ही मोहीम आयोजित केली होती.  यामध्ये पिंपरी चिंचवड मधील एम. एम. ज्युनिअर कॉलेज, अमृता विद्यालयम, ज्ञानप्रबोधिनी नवनगर विद्यालय यांचे विद्यार्थी व गजानन राजमाने, शेखर कुलकर्णी, सुभाष गदादे हे अध्यापक सहभागी झाले होते.

यावेऴी इंडोसायकलिस्ट क्लब, आवर्तन ग्रुप, ओम निसर्ग ग्रुप, आखील भारतीय विद्यार्थी परिषद, वनवासी कल्याण आश्रम, चला मारु फेरफटका, सावरकर मंडळ महिला विभाग, वनविभागाचे परिमंडल अधिकारी जी. बी. गायकवाड, वनरक्षक सुनिल भुजबळ, विजय सातपुते, दिपक पंडीत, मनेश म्हस्के, दिपक नलावडे, शैलेश भिडे, सुभाष थोरात, विनीत दाते, राजेश कुंभार, पराग कुलकर्णी, धनंजय शेडबाळे, श्रीकांत मापारी, अजीत पाटील, घुलेसर, दिपक ब्रह्मे,  राजेश कुंभार, रोहिदास जाधव, मुक्ता चैतन्य, श्रेया पंडीत आणि ग्रंथालयाचे कार्यकर्ते आदी उपस्थित होते. तर या मोहिमेचे संयोजन भास्कर रिकामे यांनी केले.