Pimpri

पाचव्या भक्ती-शक्ती सायक्लोथॉनला उत्स्फूर्त प्रतिसाद

By PCB Author

November 30, 2021

पिंपरी, दि. ३० (पीसीबी) – इन्डो अथलेटिक्स सोसायटीतर्फे निगडी ते लोणावळा अशी दरवर्षी घेण्यात येणारी १०० किलोमीटर सायकलिंग स्पर्धेला उस्फुर्त प्रतिसाद , संपूर्ण भारतातून १२०० हून आधीक जणांनी सहभाग घेतला. आरोग्य आणि क्रीडा क्षेत्रामध्ये असणारी अग्रगण्य संस्था इन्डो अथलेटिक्स सोसायटी यांनी उपक्रम राबवण्यात आला. सदर स्पर्धेचे यंदा पाचवे वर्ष होते. सर्व सहभागी सायकल सोबत सकाळी 5 वाजता भक्ती शक्ती निगडी येथे जमले होते. प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक अनिल फरांदे, उद्योजक अण्णा बिरादर, उद्योजक सुभाष जयसिंगाणी, इंडियन मेडिकल असोसिएशनचे डॉ.  विजय सातव, डॉ. संतोष  लाटकर , सनदी लेखापाल कृष्णलाल बंसल, आयएएस चे गजानन खैरे, गणेश भुजबळ, अजित पाटील यांच्यातर्फे झेंडा दाखवून सुरुवात करण्यात आली.

भक्ती शक्ती सायक्लोथॉन दरवर्षी तीन प्रकारांमध्ये घेतली जाते. त्याचा मार्ग खालील प्रमाणे होता.

वीस किलोमीटर : भक्ती शक्ती निगडी – रावेत – किवळे – देहूरोड. पन्नास किलोमीटर : भक्ती शक्ती निगडी – रावेत – किवळे – देहूरोड – तळेगाव – वडगाव – कान्हे फाटा. शंभर किलोमीटर : भक्ती शक्ती निगडी – रावेत – किवळे – देहूरोड – तळेगाव – वडगाव – कान्हे फाटा – कामशेत – लोणावळा.

पुणे पिंपरी चिंचवड,अहमदनगर, नारायणगाव, उदगीर तसेच महाराष्ट्राच्या विविध भागातून सायकल प्रेमींनी या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला. उदगीर , लातूर येथील ५० जण एस टी संपामुळे येऊ नाही शकले तर त्यांनी उदगीर येथूनच १०० किमी अंतर सायकलिंग करून भक्ती शक्ती सायक्लोथॉन मध्ये सहभाग नोंदवला. या प्रसंगी शहरातील उद्योजक श्री.  महेश खेडकर , श्री. गुरुराज चरंतीमठ , श्री. मृत्युन्जय हिरेमठ , श्री. अशोक गुप्ता , श्री. अंकाजी पाटील , श्री. श्रीकृष्ण करकरे , श्री. एस. बी. पाटील , डॉ. सुधीर पाटील , श्री. अशोक लुल्ला , श्री. विनोद बन्सल , श्री. समीर देशमुख , श्री. धनराज कोडनानी , श्री.  राम शरण गुप्ता जी , श्री. तात्यासाहेब शेवाळे , डॉ सुरेश पेठे, श्री. जगमोहन सिंग , श्री. सुजित तर्कूसे, श्री.  रवींद्र हिरेमठ आदी मान्यवर उपस्थित होते.

सायकल हि काळाची गरज आहे आणि हि गोष्ट इंडो ऍथलेटिक संस्थेने खूप आधी ओळखून साधारण १० वर्षांपासून या संधर्भात जनजागृती चे काम हाती घेतले असे मत उदयॊजक अण्णारे बिरादार यांनी व्यक्त केले. एक वर्षात १० हजार किमी सायकलींग करून माझा मध्ये खूप सकारात्मक ऊर्जा निर्माण झाली आणि त्याचा मला रोजचा दिवस खूप छान जातो हाच बदल सर्वांमध्ये घडावा असे मत सनदी लेखापाल कृष्णलाल बन्सल यांनी व्यक्त केले. आम्ही रोज दुर्गा टेकडी ला सकाळी जातो तर शहरवासीयांनी योगा , सायकल , चालणे आणि इतर कोणताही व्यायाम करावा पण सातत्य महत्वाचे आहे असे उद्योजक सुभाष जयसिंघानी यांनी व्यक्त केले.  श्री. बाळ भिंगारकर यांनी सायकल संदर्भात ” सायकल चालवो , प्रदूषण हटाओ ” अशा जोरदार घोषणा दिल्या.

भक्ती शक्ती सायक्लोथॉन चा नियोजना मध्ये इंडो ऍथलेटिक सोसायटी चा जम्बो टीम चा सहभाग होता, १०० किमी अंतरावर त्यांनी सर्व सहभागी सायकल स्वरांचे सुरक्षितता व हैड्रेशन ची उत्तम काळजी घेतली. त्यात गिरीराज उमरीकर , संजीवनी वायाळ , माधुरी पाचपांडे , संदीप परदेशी, संजय साठे , प्रमोद चिंचवडे , अविनाश चौगुले, रवी पाटील, असीम दरेकर , आशिष भामरे , मंदार जंगम , हाजी देवनीकर, संदीप लोहकर, अमित पवार, नितीन पवार, अभिनंदन कासार, सुशील मोरे , रोहित जयसिंघानी , केदार देव , प्रशांत तायडे, प्रतीक पवार, संजय देशमुख , गजेंद्र ननावरे , चिन्मय पाटील , प्रवीण खाडे  , माधव काळे , हर्षवर्धन मोरे , शैलेश पाटील , आशिष सोलाओ , सुजित मेनन , माधवन स्वामी , देविदास खुर्द , विनोद खोब्रागडें , बळीराम शिंदे , श्रीकांत चौधरी , रोहन कुंभार तर कपिल पाटील यांनी सूत्रसंचालन केले.