पाकिस्तान हा देश सुरक्षित नाही- ग्रान्ट फ्लॉवर

0
636

नवी दिल्ली, दि. १७ (पीसीबी) – पाकिस्तानात स्वातंत्र्य नाही आणि सुरक्षेच्या दृष्टीकोनातून पाहिले तरी पाकिस्तान हा देश सुरक्षित नाही, असे विधान पाकिस्तान संघाचे गोलंदाजीचे माजी प्रशिक्षक ग्रान्ट फ्लॉवर यांनी केले आहे. ‘या गोष्टी या देशात राहून तुम्हाला अधिक चीड आणतात,’ असेही फ्लॉवर म्हणतात.

फ्लॉवर २०१४ पासून पाकिस्तानी क्रिकेट संघाचे प्रशिक्षक होते. मागील आठवड्यात त्यांचे कंत्राट संपल्यानंतर त्यांना मुदतवाढ दिलेली नाही. एका वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी पाकिस्तानी संघासोबतचे आपले अनुभव सांगितले. पाकिस्तानात राहताना कुठली गोष्ट सर्वाधिक तापदायक होती, असे विचारता त्यांनी सुरक्षितता आणि स्वातंत्र्याच्या संकोचाचा मुद्दा उपस्थित केला.

२००९ मध्ये पाकिस्तान दौऱ्यावर आलेल्या श्रीलंकेच्या संघावर दहशतवादी हल्ला झाला होता. यानंतर जगातल्या खूपच थोड्या संघांनी पाकिस्तानचा दौरा केला.