पाकिस्तान दहशतवाद्यांचा गौरव करतो; सुषमा स्वराज यांचा संयुक्त राष्ट्रात हल्लाबोल

0
428

नवी दिल्ली, दि. ३० (पीसीबी) – संयुक्त राष्ट्र महासभेमध्ये बोलताना परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी दहशतवादाच्या मुद्यावरुन पाकिस्तानला खडे बोल सुनावले. आज दहशतवादाचा राक्षस जगाच्या प्रत्येक देशापर्यंत पोहोचला आहे. भारत कित्येक वर्षांपासून दहशतवादाची झळ सोसतोय. महत्वाचे म्हणजे दहशतवादाचे हे आव्हान कुठल्या दूरच्या देशामुळे नव्हे तर शेजारी देशामुळे निर्माण झाले आहे. हा देश दहशतवाद पसरवण्यातच नव्हे तर दहशतवादाचे आरोप फेटाळून लावण्यातही माहीर आहे अशी बोचरी टीका स्वराज यांनी केली.