Videsh

‘पाकिस्तानी सैनिकांच्या रक्ताचा हिशेब चुकता करू’; पाक लष्करप्रमुखांनी ओकली गरळ

By PCB Author

September 07, 2018

रावळपिंडी, दि. ७ (पीसीबी) – ‘पाकिस्तानी सैनिकांच्या रक्ताचा हिशेब चुकता करू’ अशा शब्दात पाक लष्कर प्रमुख कमर जावेद बाजवा यांनी भारताला धमकी दिली आहे. पाकिस्तानच्या सीमेवर ज्या जवानांनी आपले रक्त सांडले आहे. देशासाठी आपले प्राण गमावले, त्या सर्वाचा हिशेब चुकता करणार, असा पवित्रा पाक लष्करप्रमुखांनी घेतला आहे.

पाकिस्तानच्या सीमा सुरक्षा दिवसनिमित्त रावळपिंडीतील सैन्य मुख्यालयात आयोजित कार्यक्रमात लष्करप्रमुख कमर जावेद बाजवा बोलत होते.

यावेळी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान देखील उपस्थित होते. शिवाय पाकिस्तानी सैन्याने देशावर आलेल्या प्रत्येक संकटावेळी शहीदत्व स्वीकारुन देशाचे रक्षण केले आहे. जगभरात मागील काही वर्षांपासून दहशतवादाने खळबळ माजवली आहे. त्यातून पाकिस्तानही सुटला नाही. पाक जनतेच्या घरात, शाळांमध्ये, सार्वजनिक ठिकाणी दहशतवादी हल्ले झाले. तरी, पाकिस्तानी सैन्य दहशतवादाशी लढण्यास सज्ज आहे, असे पाकिस्तानचे लष्करप्रमुख म्हणाले.