पाकिस्तानी नववधूची पत्रकाराला धमकी ;टॉमॅटोला हात लावला तर मारेन

0
894

दि.२० (पीसीबी)-सध्या पाकिस्तानच्या नागरिकांचे महागाईमुळे चांगलेच हाल झाले आहे. भारताने टॉमॅटो निर्यात बंदी केल्याने पाकिस्तानात टोमॅटोला पाकिस्तानात सोन्याचे भाव आला आहे. टॉमॅटोचे भाव गगनाला भिडल्याने पाकिस्तानच्या एका नववधुने आपल्या लग्नात चक्क टॉमॅटोचे दागिने परिधान केले आहेत.

पाकिस्तानी नववधूने सोन्याच्या दागिन्यांऐवजी टॉमॅटोचे दागिने घातले होते. पत्रकाराशी संवाद साधतना नववधू म्हणाली की सोन्याच्या किंमती खूप वाढल्या आहेत. टॉमॅटोचेही भाव वधारले आहेत. म्हणून मी माझ्या लग्नात सोन्याचे दागिन्यांऐवजी टॉमॅटोचे दागिने घतले आहेत.

पत्रकाराने सहज त्या टॉमॅटोला हात लावला तर नववधू चिडली आणि पत्रकारला म्हणाली माझ्या टॉमॅटोला हात लावलास तर मारेन इतकेच नव्हे तर वधुच्या पालकांनी नवर्‍या मुलाला हुंड्यात तीन पेट्या टॉमॅटो दिल्या आहेत. या मुलाखातीचा व्हिडीओ इंटरनेटवर चांगलाच व्हायरल होत आहे.

सध्या पाकिस्तानमध्ये एक किलो टॉमॅटोची किंमत तब्बल 300 रुपये किलो आहेत..