Maharashtra

पाकिस्तानी झेंड्यासोबतच्या फोटोवर राखीचा मोठा खुलासा  

By PCB Author

May 09, 2019

मुंबई, दि. ९ (पीसीबी) – बॉलिवूडची  नटखट अभिनेत्री  राखी सावंत एका फोटोमुळे  पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. राखीने पाकिस्तानी झेंड्यासोबतचे तिचे काही फोटो सोशल मीडियावर  पोस्ट  केले आहेत. या फोटोवरून राखीवर टीकेची झोड उठवण्यात येत आहे. तसेच तिला ट्रोल करण्यास सुरुवात  झाली आहे.

यावर राखीने खुलासा केला आहे. राखीने  एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यामध्ये तिने म्हटले आहे की, हाय फ्रेंड्स, हा एक पाकिस्तानी सेटअप आहे. ‘धारा ३७०’ असे या चित्रपटाचे नाव आहे.  हा चित्रपट काश्मीरी पंडितांवर आधारित आहे. मी या चित्रपटात एका पाकिस्तानी तरुणीची भूमिका  साकारत  आहे. तुम्ही माझे कपडे पाहू शकता, या चित्रपटात लहान मुलांना जिहादी बनवणाऱ्या दहशतवादी संघटनांचा भांडाफोड करणाऱ्या तरुणीची भूमिका मी करत आहे.

दरम्यान, अपलोड केलेल्या फोटोसोबत दिलेल्या कॅप्शनमध्ये राखीने  म्हटले होते की, मला माझा भारत देश खूप प्रिय आहे. हा फोटो माझा आगामी चित्रपट ‘धारा ३७०’ मधील लोकेशनवरचा आहे.  या फोटोवर चाहत्यांनी  नाराजी व्यक्त केली होती. या फोटोनंतर अनेकांनी तिला पाकिस्तानला जाण्याचा सल्लादेखील  दिला होता.