पाकिस्तानी कलाकारांसोबत काम करणार नाही; सिने इंडस्ट्रीचा निर्णय

0
599

मुंबई, दि. १७ (पीसीबी) – पुलवामा हल्ल्यानंतर देशभरात संतापाची लाट आली असून   इंडियन फिल्म अँड टेलिव्हिजन डायरेक्टर्स असोसिएशनने  या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ पाकिस्तानी कलाकारांसोबत काम केले जाणार नाही, अशी माहिती असोसिएशनचे अध्यक्ष सिनेनिर्माता अशोक पंडित यांनी आज (रविवार) येथे दिली.

जम्मू-काश्मीरमधील हल्ल्याच्या निषेधार्थ गोरेगाव येथील फिल्मसिटीमधील शूटिंग बंद ठेवण्यात आले होते. दुपारी येथे पुलवामातील हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली. जवानांच बलिदान व्यर्थ जाऊ देणार नाही, अशी शपथ यावेळी घेण्यात आली.

अशोक पंडित म्हणाले की,  फिल्म इंडस्ट्रीतील लाखो लोक सुरक्षा दल आणि सरकारसोबत खांद्याला खांदा लावून उभे आहेत. आमचे असोशिएशनने निर्णय घेतला आहे की पाकिस्तानी कलाकारांसोबत काम केले जाणार नाही.  यावेळी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवाग, हरभजन सिंह, सुरेश रैना आणि मोहम्मद कैफ  उपस्थित होते.