Desh

पाकिस्तानला राफेल विमान न मिळाल्यामुळे राहुल गांधी नाराज – भाजप मंत्री

By PCB Author

October 15, 2018

नवी दिल्ली, दि.१५ (पीसीबी) – राफेल विमान पाकिस्तानला न मिळाल्यामुळे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी नाराज आहेत. अत्यंत कठोर परिश्रमानंतर भारताला राफेल मिळाले आहे. पाकिस्तानला ते मिळू शकले नाही. त्यामुळे राहुल गांधी कमालीचे त्रस्त झाले आहेत. मोदीजींना हा व्यवहार करता आला. आणि पाकिस्तानला ही विमाने मिळवण्यात अपयश आले आहे. हे राहुल गांधींना सहन होत नाही, असे भाजपचे राजस्थानातील मंत्री जसवंत सिंह यादव यांनी म्हटले आहे.

यादव पुढे म्हणाले की, राहुल गांधी पाकिस्तानला खूश करण्यासाठी हिंदुंचा अपमान करतात. ते  म्हणतात की, हिंदू दहशतवादी आहेत. असा माणूस पंतप्रधान बनून काय करेल ? ते भारतातील लोकांनाच सांगतात की, हिंदू दहशतवादी आहेत. याचा अर्थ काय आहे ? जर तुम्हाला पाकिस्तानला खूश करायचे आहे तर तुम्ही आम्हाला का अपमानित करत आहात ?

दरम्यान, राहुल गांधी यांनी राफेल विमान करारावरुन सातत्याने पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्ला चढवताना दिसत आहेत. या व्यवहारामुळे सरकारला ४१ हजार २०५ कोटी रुपयांचा चुना लागल्याचा दावा काँग्रेसने केला आहे. या व्यवहारात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप  राहुल गांधी यांनी केला आहे. हा व्यवहार मोदींशी निकटवर्तीय असलेल्या दिवाळखोर उद्योगपतींसाठी केल्याचा गंभीर आरोपही राहुल गांधींनी केला आहे.