Desh

पाकिस्तानने अण्वस्त्रे ईदसाठी ठेवलेली नाहीत; मेहबूबा मुफ्तींचे मोदींना प्रत्युत्तर

By PCB Author

April 22, 2019

नवी दिल्ली, दि. २२ (पीसीबी) – पाकिस्तानकडे जी अण्वस्त्रे आहेत,  ती सुद्धा त्यांनी ईदसाठी ठेवलेली नाहीत. येथे हिशोब बरोबर केला जातो,  अशा शब्दांत पीडीपीच्या प्रमुख मेहबूबा मुफ्ती यांनी पंतप्रधान मोदी यांना प्रत्युत्तर दिले आहे.

पंतप्रधान  मोदी यांनी राजस्थानच्या बाडमेरमधील सभेमध्ये पाकिस्तान वारंवार भारताला त्यांच्याकडे असलेल्या अण्वस्रांची धमकी देत आला आहे. मात्र, आता भारत त्यांच्या धमक्यांना घाबरत नाही. आमच्याकडेही अण्वस्त्रे आहेत ते आम्ही दिवाळीसाठी राखून ठेवलेले नाहीत, असे म्हटले होते.  यावर मेहबूबा मुफ्ती यांनी यांनी पलटवार केला आहे.

दरम्यान, भारताने पाकिस्तानच्या धमक्यांना घाबरण्याचे धोरण आता सोडून दिले आहे. याआधी पाकिस्तान नेहमी भारताला अण्वस्रांची धमकी देत होता. पाकिस्तान म्हणायचा की आमच्याकडे न्युक्लिअर बटन आहे. मग भारताकडे काय आहे? आमच्याकडील अण्वस्त्रे आम्ही दिवाळीसाठी ठेवलेली नाहीत, असे मोदींनी म्हटले होते.