Desh

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी केले मोदींचे अभिनंदन

By PCB Author

May 23, 2019

नवी दिल्ली, दि. २३ (पीसीबी) – लोकसभा निवडणुकीतील भाजपला मिळालेल्या विजयाबद्द्ल पंतप्रधान मोदी यांच्यावर जगभरातून शुभेच्छांचा वर्षाव सुरू झाला आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी देखील मोदींचे अभिनंदन केले आहे. भाजप आणि त्यांच्या सहकारी पक्षांनी मिळवलेल्या विजयाबद्दल नरेंद्र मोदीचे अभिनंदन असे ट्विट  इम्रान खान यांनी केले आहे.