Desh

पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून भारतीय जवानांकडून २२ दहशतवादी, ११ पाक सैन्याचा खात्मा

By PCB Author

October 20, 2019

श्रीनगर, दि. २० (पीसीबी) –  पाकव्याप्त काश्मीरमधील तंगधार सेक्टरमध्ये  घुसून भारतीय  जवानांनी २२ दहशतवादी आणि ११ पाकिस्तानी सैन्याचा खात्मा केला. तसेच  दहशतवाद्यांचे ७ तळ उद्धवस्त केले. सीमेवर पाकिस्तानकडून वारंवार शस्त्रसंधीचे उल्लंघन सुरु आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय लष्कराच्या जवानांनी  ही कारवाई आज (रविवार) सकाळी  केली.

जम्मू काश्मीरमधील तंगधार सेक्टरमध्ये पाकिस्तानी सैन्याकडून अंदाधुंद गोळीबार केला. पाककडून केल्या जाणाऱ्या या  गोळीबाराला भारतीय लष्कराने सडेतोड प्रत्युत्तर  दिले.  त्यात भारतीय लष्कराने सीमेलगत पाकच्या हद्दीत असलेली सात दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. या कारवाईत दोन भारतीय जवानांना वीरमरण आले. तर एका नागरिकाचाही मृत्यू झाला. भारतीय लष्कराने दहशतवाद्यांच्या छावण्यांना लक्ष्य करण्यासाठी तोफांचा मारा केला. या हल्ल्यात पाकिस्तानी सैन्याची तळ देखील उद्धवस्त झाली आहेत.

दहशतवाद्यांना भारतात घुसखोरी करता यावी, या उद्देशाने पाकिस्तानी लष्कराने जम्मू काश्मीरमधील सीमेलगतच्या तंगधार सेक्टरमध्ये रविवारी शस्त्रसंधीचे उल्लंघन केले गेले. पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लघन करत भारतीय चौक्यांवर गोळीबार सुरु केला. त्याला भारतीय लष्करानेही चोख प्रत्युत्तर दिले. दरम्यान, पाकिस्तानच्या गोळीबाराला भारताकडून प्रत्युत्तर दिले जात आहे.