Pimpri

पाईपलाईन दुरुस्तीच्या कामामुळे शनिवारी, रविवारी शहरातील ‘या’ भागातील पाणीपुरवठा विस्कळीत

By PCB Author

August 05, 2022

पिंपरी दि. ४ (पीसीबी) – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या रावेत येथील अशुद्ध जलउपसा केंद्रातील भोसरी आणि चिंचवड पाईपलाईनवर मोठ्या प्रमाणात गळती होत आहे. त्याचे दुरुस्तीचे काम तातडीने करण्यात येणार आहे. त्यासाठी या दोन पाईपलाईनवर अवलंबून असलेला पाणीपुरवठा शनिवारी (दि.6) आणि रविवारी (दि.7) विस्कळीत असणार आहे.

गळती थांबविण्यासाठी शनिवारी (दि.6) भोसरी, गावठाण, इंद्रायणीनगर, बो-हाडेवाडी, मोशी, च-होली, डुडुळगाव, दिघी, संत तुकारामनगर, मॅगझीन परिसर, बोपखेल, प्रेमलोक पार्क, चिंचवडगाव, पवनाननगर, रस्टन कॉलनी, सुदर्शन नगर, प्रा. रामकृष्ण मोरे परिसर, पिंपरीगाव, पिंपरीनगर, पिंपळेसौदागर, पिंपळेगुरव, दापोडी, जुनी सांगवी, नवी सांगवी, नेहरुनगर, वल्लभनगर, कासारवाडीचा रेल्वे गट वरील परिसर, प्राधिकरण सेक्टर क्रमांक 23 आणि 26, सिद्धिविनायकनगरी, वाहतूकनगरी इत्यादी भागाचा दुपार, संध्याकाळचा पाणीपुरवठा होणार नाही.

तसेच दुस-यादिवशी रविवारी (दि.7) सकाळच्या वेळापत्रकानुसार होणारा पाणीपुरवठा कमी दाबाने होणार आहे. त्यामुळे पाण्याचा काटकसरीने वापर करुन सहकार्य करण्याचे आवाहन महापालिका पाणीपुरवठा विभागाने केले आहे.