“पांडूरंगा.. लवकर हे संकट दूर कर” आव्हाड यांनी पंढरीच्या विठूरायारला घातले साकडं

0
335

 

पंढरपूर, दि.४ (पीसीबी) – गृहनिर्माण मंत्री व सोलापूरचे नूतन पालकमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे. आव्हाड यांनी शुक्रवारी पंढरपूरचा दौरा केला.

यावेळी पंढरीच्या विठूरायारला आव्हाड यांनी साकडं घातले. मात्र मंदिर बंद असल्याने त्यांनी संत नामदेव पायरी शेजारील संत चोखोबा यांच्या समाधीचे दर्शन घेतले. आणि त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

यावेळी बोलताना ते म्हणाले की, ‘विठुराया ! देशावर ‘कोरोना’रुपी आलेलं संकट दूर कर’.करोनाचे संकट दूर कर, असे आव्हाड यांनी यावेळी म्हटले. तर करोनामुळे सामाजिक वास्तव समोर आले असून स्वातंत्र्यापेक्षा अधिकचे स्थलांतर आत्ता झाल्याचेही त्यांनी बोलून दाखवलं. करोनाच्या विषाणूंचा नायनाट करण्याची ताकद विठ्ठलामध्ये आहे. प्रिय पांडूरंगा.. लवकर हे संकट दूर कर, असे आव्हाड यांनी सांगितले.

माणुसकीची ओळख करून देणारे हे दिवस आहेत. त्यामुळे जे लोक चालत आहेत. त्यांना आपल्या घासातील एक घास द्या,’ असे आवाहन जितेंद्र आव्हाड यांनी जनतेला केले आहे.