पहिल्या महिला मुख्यमंत्रिपदासाठी सुप्रिया सुळेंनी सुचवले ‘यांचे’ नांव

0
824

मुंबई, दि. १८ (पीसीबी) – काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे या वकील आहेत. त्या आपल्या कामात कष्ट घेतात. तसेच स्थानिक पातळीवर त्यांचे खूप चांगले काम आहे.  महिला मुख्यमंत्री म्हणून त्या पर्याय ठरू शकतात, असे राष्ट्रवादीच्या खासदार  सुप्रिया सुळे यांनी  म्हटले आहे.

एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सुळे बोलत होत्या. यावेळी  त्यांना महिला मुख्यमंत्री म्हणून तुम्ही कोणाला पसंती द्याल. यावर त्यांनी मुख्यमंत्रिपदासाठी प्रणिती शिंदे यांचे नांव सुचवले.

मी खासदार म्हणून संसदेत चांगले काम करत आहे. मी देशात प्रत्येक सत्रात पहिली येते. मी केंद्रात खूश आहे, राज्याच्या राजकारणात येण्याचा माझा विचार नाही, असे उत्तर राज्याच्या राजकारणात येणार का  या  प्रश्नावर सुळे यांनी दिले.

कोणताही राजकीय पक्ष एका कुटुंबाची मक्तेदारी नाही. त्यामुळे पक्षाचा वारसदार पक्ष आणि कार्यकर्ते ठरवतील, असे सांगून  त्यांनी  शरद पवारांच्या राजकीय वारसदाराबाबतचा प्रश्न टोलवून लावला.