Maharashtra

पहिल्या टप्प्यासाठी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस; गडकरी, चव्हाण, शिंदेसह अनेक दिग्गज अर्ज भरणार

By PCB Author

March 25, 2019

नवी दिल्ली, दि. २५ (पीसीबी) – लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी निवडणूक अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस असल्याने केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी, माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, अभिनेते राज बब्बर आणि अभिनेत्री हेमा मालिनी यांच्यासह अनेक दिग्गज अर्ज भरणार आहेत. पहिल्या टप्प्यासाठी ११ एप्रिल रोजी मतदान होणार असून २३ मे रोजी निवडणूक निकाल जाहीर होणार आहेत.

पहिल्या टप्प्यासाठी २० राज्यांतील ९१ जागांवर मतदान होणार असून त्यासाठी आज अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस आहे. पहिल्या टप्प्यात नागपूरमधून केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी, सोलापूरमधून माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, नांदेडमधून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, अमरावतीतून शिवसेनेचे खासदार आनंदराव अडसूळ, यवतमाळमधून भावना गवळी, अकोल्यातून भाजपचे विद्यमान खासदार संजय धोत्रे, बीडमधून प्रीतम मुंडे, मथुरामधून भाजप खासदार हेमा मालिनी, नागपूरमधून काँग्रेसचे नेते नाना पटोले, गाझियाबादमधून व्ही.के. सिंह आणि काँग्रेसचे उत्तर प्रदेशचे प्रदेशाध्यक्ष राज बब्बर हे फतेहपूर सिक्री येथून अर्ज भरणार आहेत.