पहिल्याच महिन्यात मोदी २० हजार किलोमीटर प्रवास करून २० नेत्यांना भेटणार

0
663

नवी दिल्ली, दि. ३१ (पीसीबी) – पंतप्रधान नरेंद्र मोदी दुसऱ्यांदा पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर पहिल्या महिन्यातच तीन देशांचा दौरा करणार आहेत. पहिला दौरा मालदीव आहे. दुसऱ्या आठवड्यात ते किर्गिस्तानला जातील. महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात ते जी-२० शिखर बैठकीत सहभागी होण्यासाठी जपान भेटीवर जातील. या दौऱ्यांत त्यांची जगभरातील अनेक नेत्यांशी भेट व चर्चा होईल. दुसऱ्या कार्यकाळातील पहिल्या ३० दिवसांत ८ तासांचा प्रवास करून माली ते दिल्ली येणे-जाणे, सुमारे ४० तासांचा प्रवास करून ओसाका, तर ७ तासांची बिश्केक भेट असा मोदींचा परदेश कार्यक्रम आहे. ते एकूण ५५ तासांचा हवाई प्रवास करतील. त्यांचा २० हजार किमींचा प्रवासही होईल.

मोदींचा पहिला दौरा मालदीवच आहे. चीनच्या वर्चस्वातून मालदीवची सुटका करण्याच्या रणनीतीनुसार हा परदेश दौरा महत्त्वाचा मानला जातो. मोदींच्या परदेश दौऱ्यात सर्वांची नजर किर्गिस्तानवर राहील.  इम्रान खान यांच्यासोबत त्यांची भेट मानली जात होती. दुसरीकडे ओसाकामध्ये २८ जूनच्या शिखर बैठकीत जागतिक दर्जाचे नेते मोदींना भेटतील. त्याशिवाय अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प, ब्रिटन, फ्रान्स, जर्मनीसारख्या पश्चिमेकडील देशांचे नेते व आसियान देशांच्या नेत्यांचीदेखील ते भेट घेतील.

तारीख/देश

7-8 जून

राष्ट्रपती इब्राहिम सोलिह मालदीव मालदीव (संसदेत मार्गदर्शनही)

13-14 जून

व्लादिमीर पुतीन, शी जिनपिंग

28-29 जून

ओसाका (जपान)

डोनाल्ड ट्रम्प, शिंजो अॅबे,पुतीन, जिनपिंग,अँगेला मर्केल, इम्यॅनुएल मॅक्रॉन,मून जेई इन, मोहंमद बिन सलमान, थेरेसा मे, रेसेप एर्दोगन, स्कॉट मॉरिसन, जोको विडोडो, ली सियन, प्रत्युत चान, महाथिर मोहंमद