Pimpri

पहाटेच्या वेळी रिक्षातुन प्रवास करताना घडले असे काही…

By PCB Author

June 07, 2021

निगडी, दि. ७ (पीसीबी) – पहाटेच्या वेळी रिक्षातून प्रवास करत असताना रिक्षातील तीन जणांनी मिळून शस्त्राचा धाक दाखवून प्रवाशाला लुटले. ही घटना शुक्रवारी (दि. 4) स्पाईन रोड निगडी येथे घडली. वीरेंद्र अर्जुन सरोज (वय 43, रा. आल्हाट वस्ती, निघोजे. मूळ रा. उत्तर प्रदेश) यांनी याबाबत निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार रिक्षातील तीन जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी शुक्रवारी पहाटे पाच वाजताच्या सुमारास स्पाईन रोड निगडी येथून तळवडेकडे एका रिक्षातून जात होते. चिकन चौकाच्या पुढे काही अंतरावर रिक्षा आली असता रिक्षातील तीन जणांनी फिर्यादी यांना लोखंडी चाॅपर सारख्या हत्याराचा धाक दाखवला. तसेच त्यांच्या हातावर आणि पायावर वार करून जखमी केले. आरोपींनी फिर्यादी यांच्याकडून मोबाईल फोन आणि सॅग असा दोन हजाराचा ऐवज जबरदस्तीने चोरून नेला. निगडी पोलीस तपास करीत आहेत.