Notifications

पसंतीचे चॅनल्स निवडा; अन्यथा १ फेब्रुवारीपासून टीव्ही बंद ?

By PCB Author

January 24, 2019

नवी दिल्ली, दि. २४ (पीसीबी) – टेलिकॉम रेग्युलेटरी अथॉरिटी ऑफ इंडियाने (ट्राय) आपल्या पसंतीचे टीव्ही चॅनल्स निवडून त्या चॅनल्सचे शुल्क भरण्याची नवी योजना आणली आहे. येत्या १ फेब्रुवारीपासून या नव्या व्यवस्थेची अंमलबजावणी  करण्यात येणार आहे.  परंतु, सुमारे १६ कोटी ५० लाख डायरेक्ट टू होम डीटीएच आणि केबल ग्राहकांपैकी तब्बल ६५  टक्के ग्राहकांनी आपल्या  पसंतीच्या  चॅनल्सची यादीच  तयार  नाही. त्यामुळे या ग्राहकांचा टीव्ही बंद होण्याची शक्यता आहे, अशी माहिती ट्रायचे सल्लागार अरविंद कुमार यांनी दिली आहे.