Desh

पश्चिम बंगालमध्ये भाजपला दुहेरी आकडा पार करण्यासाठी संघर्ष करावा लागेल : प्रशांत किशोर

By PCB Author

December 21, 2020

कोलकाता, दि. २१ (पीसीबी) – पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीसाठी सत्ताधारी तृणमूल काँग्रेस आणि भाजपची जोरदार तयारी सुरु आहे. त्यातच “पश्चिम बंगालमध्ये भाजपला दुहेरी आकडा पार करण्यासाठी संघर्ष करावा लागेल, असा दावा रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी केला आहे.

प्रशांत किशोर यांच्याविरोधात नाराजीचे सूर

टीएमसीच्या अनेक मोठ्या नेत्यांनी पक्षाला रामराम केला आहे. शुभेंदू अधिकारी यांनी पक्ष सोडल्यानंतर आणखी नाराजी दिसत आहे. हे नाराजीचे सूर प्रशांत किशोर यांच्याविरोधातील आहे. हावडाच्या शिवपूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार जटू लाहिडी यांनी पीके यांच्याविरोधात बंड पुकारलं आहे. लाहिडी यांनी थेट प्रशांत किशोर यांच्यावर हल्लाबोल करताना म्हटलं आहे की ते आल्यामुळे पक्षाचं मोठं नुकसान होत आहे. ममता बॅनर्जी यांनी पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रशांत किशोर यांच्यासोबत करार केला आहे. प्रशांत किशोर हे ममता बॅनर्जी यांचे भाचे खासदार अभिषेक बॅनर्जी यांच्यासोबत सक्रियरित्या काम करत आहेत. परंतु टीएमसीच्या अनेक जुन्या नेत्यांना प्रशांत किशोर यांची पद्धत पटत नाही. काही बंडखोर नेत्यांनी स्पष्टपणे प्रशांत किशोर आणि अभिषेक बॅनर्जी यांचा हस्तक्षेप वाढल्याचा आरोप केला आहे.