Desh

पश्चिम बंगालमध्ये आत्मघाती हल्ल्यासाठी गर्भवती महिलेचा वापर; गुप्तचर संघटनेचा इशारा   

By PCB Author

May 11, 2019

कोलकाता, दि.११ (पीसीबी) – पश्चिम बंगाल आणि बांगलादेशात आयसीस आणि  इतर दहशतवादी संघटनांकडून आत्मघाती हल्ला होऊ शकतो, असा इशारा केंद्रीय गुप्तचर संघटनेने  दिला आहे.  बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी  हिंदू आणि बौद्ध मंदिरात हल्ला होण्याची शक्यता आहे. यासाठी गर्भवती महिलेचा वापर होऊ शकतो, असाही  इशारा  देण्यात आला आहे.

याबाबत बंगाल पोलिसांना  सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.  बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी जमाल उल मुजाहिद्दीन बांग्लादेश  किंवा इस्लामिक स्टेट  दहशतवादी संघटना आत्मघातकी हल्ला घडवून आणण्याच्या तयारीत आहे. दहशतवादी पश्चिम बंगाल किंवा बांग्लादेशात हा हल्ला घडवून आणू शकतात, असेही  म्हटले आहे.

गर्भवती महिलेच्या रुपात हिंदू किंवा बौद्ध मंदिरात  आत्मघातकी हल्लेखोर दाखल होऊ शकतात.  पश्चिम बंगालच्या सरकारला योग्य ती खबरदारी घेण्याची सूचना  केल्या आहेत. पश्चिम बंगाल पोलिसांनी राज्यातील  बौद्ध आणि हिंदू मंदिरात सुरक्षा व्यवस्था तैनात केली आहे. दहशतवाद्यांना कोणतीही संधी  मिळणार नाही, अशी सुरक्षा यंत्रणा तैनात केल्याचे  पश्चिम बंगाल पोलिसांनी  सांगितले.