पश्चिम बंगालमधील महिला अधिकारीचा कोरोना संसर्गाने मृत्यू

0
273

पश्चिम बंगाल,दि.14(पीसीबी) : कोरोनाविरोधातील लढाईत महत्त्वाची भूमिका निभावणाऱ्या पश्चिम बंगालमधील महिला अधिकाऱ्याचा कोरोनाचा संसर्ग झाल्याने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. ‘देबदत्ता रे’ असं या महिला अधिकाऱ्याचं नाव आहे. हुगली जिल्ह्यातील चंदननगर उपविभागात उपदंडाधिकारी म्हणून त्या कार्यरत होत्या. त्यांच्या मागे पती आणि चार महिन्यांचा मुलगा आहे.

देबदत्ता रे या ३८ वर्षांच्या होत्या. त्यांना कोरोनाची लक्षणं दिसू लागल्यानंतर घरातच क्वारंटाइन होण्यास सांगण्यात आलं होतं.परंतु, रविवारी त्यांची प्रकृती ढासळली असता रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पण दुसऱ्या दिवशी सकाळी कोरोनाविरोधातील लढाईत त्यांची झुंज अपयशी ठरली.

‘देबदत्ता रे’ यांच्यावर ट्रेनमधून बंगालमध्ये परतणाऱ्या परप्रांतीय मजुरांची जबाबदारी होती. बंगालमध्ये पोहोचल्यावर त्यांच्या राहण्याची व्यवस्था करण्याची जबाबदारीही त्यांच्याकडे होती. माणुसकी आणि संवेदनशीलता दाखवत ज्या पद्धतीने त्यांनी परिस्थिती हाताळली होती त्याचं सर्वांकडून कौतुक केलं जात होतं.

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीदेखील देदत्ता रे यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे.