पवारांकडून मतदारसंघनिहाय चाचपणी; साताऱ्याचा उमेदवार ठरणार

0
457

मुंबई, दि. ७ (पीसीबी) – लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रीवादीतर्फे मतदारसंघनिहाय आढावा बैठक होणार आहे. साताऱ्याचे खासदार उदयनराजे यांच्याविषयी काय निर्णय होणार, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

गेले काही दिवस सातारा मतदारसंघ चर्चेत आहे. साताऱ्याचे खासदार उदयनराजे यांच्याविरोधात पक्षात सूर आहे. बैठकीत उदयनराजे यांच्याबद्दल स्थानिक नेते काय मत व्यक्त करतात की दुसरा उमेदवार देण्याची मागणी करतात याकडे सगळ्यांचे लक्ष लागून आहे.

साताऱ्याला नवीन उमेदवाराबाबत चाचपणी सुरु असल्याची चर्चा काही दिवसांपूर्वी होती, मात्र शरद पवारांनी या बातम्यांचे खंडन केले होते. साताऱ्यातून माजी सनदी अधिकारी श्रीनिवास पाटील यांचे नाव चर्चेत आहे. त्यामुळे आजच्या बैठकीत काय होते, हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.