Chinchwad

पवना नदीत अज्ञात तरुणाचा मृतदेह आढळल्याने खळबळ

By PCB Author

September 17, 2018

आकुर्डी, दि. १७ (पीसीबी) – पवना नदीत अज्ञात इसमाचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. ही घटना आज (सोमवार) दुपारी एकच्या सुमारास उघडकीस आली. मृताची ओळख अद्याप पटलेली नाही.

मृत इसमाचे अंदाजे वय ३० वर्ष आहे. त्याने अंगात निळ्या रंगाचा टी शर्ट आणि राखाडी पॅन्ट घातली आहे. हा इसम एक ते दोन दिवसांपूर्वी पाण्यात पडला असल्याची शक्यता अग्निशमन विभागाच्या जवानांनी वर्तवली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आज दुपारी एकच्या सुमारास पवना नदीपात्रात एका तरुणाचा मृतदेह तरंगत असल्याचे आढळून आले. याबाबत स्थानिक नागरिकांनी अग्निशमन विभागाला माहिती दिली. त्यानुसार संत तुकाराम नगर अग्निशमन विभागाचे बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले. तसेच अर्ध्या तासाच्या प्रयत्नानंतर मृतदेह बाहेर काढण्यात आला.