Pimpri

पवना धरण ८५ टक्के भरले; विसर्ग सुरु

By PCB Author

July 29, 2021

पिंपरी, दि. २९ (पीसीबी) – पिंपरी चिंचवडसह तळेगाव, देहूरोड, लष्कर तसेच सर्व कारखानदारीला पाणी पुरवठा कऱणारे पवना धरण आज ८६ टक्यांवर भरल्याने सायंकाळी ४ वाजता पाण्याचा विसर्ग सुरू कऱण्यात आला आहे. धरणाच्या सहा दरवाज्यांतून २१०० क्युसेक्स पाणी सोडण्यात आले. त्याशिवाय विद्यृत जनित्राद्वारे १४०० क्युसेक्स असे एकूण साडेतीन हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे . नदिच्या किनाऱ्यावरील नागरिकांनी खबरदारी घ्यावी असे आवाहन प्रशासनाने केले आहे. पावसाची संतताधार सुरू असल्याने पुढच्या आठवड्यात शरद १०० टक्के भरेल असा अंदाज व्यक्त कऱण्यात आला आहे. पवना धरण क्गेषेत्ल्यारात गेल्या २४ तासात झालेला12 मि.मि. पाऊस झाला. १ जूनपासून झालेला पाऊस 1712 मि.मि. आहे. गेल्या वर्षी आजच्या तारखे पर्यंत झालेला एकूण पाऊस 502 आहे. धरणातील सध्याचा पाणीसाठा 85.45 टक्के झाला आहे. गेल्या वर्षी आजच्या तारखेचा धरणातील पाणीसाठा अवघा 34.45 टक्के होता. गेल्या २४ तासात पाणीसाठ्यात 1.46% टक्के वाढ झाली आहे, तर १ जूनपासून पाणीसाठ्यात झालेली वाढ 53.86 टक्के आहे.