Banner News

पवना धरणातून १२ हजार ६०० क्यूसेक पाण्याचा विसर्ग; सतर्कतेचा इशारा  

By PCB Author

September 04, 2019

पिंपरी, दि. ४ (पीसीबी) – दोन दिवसांपासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे मावळासह पिंपरी-चिंचवड शहराला  पाणी पुरवठा करणारे पवना धरण या वर्षी  आज (बुधवार) दुसऱ्यांदा शंभर टक्के भरले आहे.  धरणातून १२ हजार ६०० क्यूसेक पाण्याचा विसर्ग   सुरू केला आहे.  त्यामुळे  नदीकाठच्या नागरिकांना  सतर्कतेचा इशारा  देण्यात आला आहे.

धरणाच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या २४ तासात तब्बल १०६ मी.मीटर पाऊस  झाला  आहे. त्यामुळे पवना धरण यावर्षी दुसऱ्यांदा  शंभर टक्के भरले आहे.   धरण परिसरात गेल्या दोन दिवसांपासून पावसाची संततधार कायम  आहे.  त्यामुळे धरणातून १२ हजार ६०० क्यूसेक पाण्याच्या विसर्ग करण्यात येत आहे.

यावर्षी धरण परिसरात ३३३७ मी.मीटर पाऊस झाला आहे. पवना नदीच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. त्यामुळे  नदीकाठच्या  नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. नदी काठच्या नागरिकांनी सुरक्षिततेची काळजी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.